भुरा लेखक शरद बाविस्कर Bhura by lekhak Sharad Baviskar Marathi Book Bhura review introduction

     'जे. एन. यु.' मधील 'प्रा. शरद बाविस्कर' यांनी लिहेलेले भुरा हे त्यांचे आत्मचरित्र आहे. सामाजीक, आर्थिक, प्रतीकुलते सोबत, त्यांनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष प्रामुख्याने मांडला आहे. त्यामुळे हे त्यांचे एकप्रकारे शैक्षणिक आत्मचरित्र आहे. शिक्षण घेणाऱ्या अथवा शैक्षणिक प्रवासात असणऱ्या तसेच पालक व शिक्षक प्रत्येकाने भुरा वाचलाच पाहिजे. हे आत्मकथन वाचताना आपण कोणत्या मार्गाने आलो आणि आता कुठे आहोत याचे सहज अवलोकन मनात होते


Bhura by lekhak Sharad Baviskar Marathi Book Bhura review introduction
Bhura by lekhak Sharad Baviskar Marathi Book Bhura review introduction


     "खर तर आपण जेंव्हा बिकट परिस्थितीतून जात असतो तेंव्हा फार तीव्रेतेने निश्चय करत असतो. मात्र जेंव्हा परिस्थिती सुसह्य होत असते, तेंव्हा आपण निश्चायातील तीव्रता विसरतो आणि फक्त निश्चयाचीच आठवण ठेवतो. तीव्रतेशिवाय निश्चय वांझोटा असतो." उपरोक्त ओळी 'शरद बाविस्कर' लिखित भुरा या आत्मकथानातील आहेत.   

     भुरा च्या माध्यमातून जीवनप्रवास मांडतांना लेखक दहाविच्या निकालापासून सुरवात करतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची, त्यात वडिलांचे अवेळी जाने, भावाची व्यसनाधीनता, वेळोवेळी होणारे वाद त्यामुळे करावे लागलेले स्थलांतर. या सगळ्या चढ उताराचा सामना कुटुंबाने केला. खोट्या प्रतिष्टेचा बुरखा घातलेल्या समाजाकडून त्यांची कायम अवहेलना आणि कुचंबना होत राहिली. त्यामुळे लेखकाचे जीवन म्हणजे जणूकाही अग्निपरीक्षाच.

     दहावी नापास झाल्याचा कलंक लागल्यावर लेखकाला समोर फक्त काळोख दिसत होता. सतत अपमान आणि अवहेलना आणि अपमान! शिक्षण नाही तर जीवन नरकासारख होईल याची लेखकाला कल्पना होती. आधीच प्रतिकूल परिस्थिती त्यात दहावी नापासचा कलंक. त्यामुळे जगून काही फायदा नाही, असे विचार मनात यायचे.सधन शेतकऱ्याच्या शेतात मोलमजुरी करणाऱ्या आणि फक्त पाचवी शिकलेल्या आईने मात्र लेखकाला नैराश्यातून बाहेर काढून न्यूनगंड घालवायला आणि पुन्हा परीक्षाद्यायला बळ दिल.

   अपयश पचवून पुन्हा परीक्षेसाठी लेखकाने मानसिक तयारी केली. परंतु नापास झाल्यापासून त्यांची जी अवहेलना झाली होती त्याचा परिणाम त्यांच्या मनावर खोलवर झाला होता. त्यांची परिस्थिती प्रतिकूल तर होतीच सोबत तिरस्कृत जीवन सुद्धा होत. त्यामुळे जिभेचा वापर हा फक्त मुलभूत गरजांसाठीच करून अंतर्मुख होण्याचा मार्ग त्यांनी पत्कारला. आणि सुरु झाला लेखकाला शैक्षणिक प्रवास! हा फक्त प्रवास नाही तर हा संघर्ष आहे, प्रतिकूल परिस्थिती विरुद्ध, तिरस्कृत जीवना विरुद्ध, आर्थिक सामाजिक विषमतेविरुध्द, आणि अन्यायी व्यवस्थ्ये विरुद्ध.


Bhura by lekhak Sharad Baviskar Marathi Book Bhura review introduction
Bhura by lekhak Sharad Baviskar Marathi Book Bhura review introduction

BHURA भुरा By Sharad Baviskar शरद बाविस्कर

     खेड्यातून सुरु झालेला भुरा चा थरारक प्रवास पार लंडनपर्यंत पोहचला. आणि जे.एन.यु. मध्ये स्थिरावला. जो सहज सोपा नक्कीच नव्हता. त्यात अनेक उतार चढाव होते. भुरा वाचतांना त्यातील अनेक प्रसंगासोबत आपण स्वतःला जुळवून घेतो. शालेय शिक्षण घेणाऱ्या अथवा शैक्षणिक प्रवासात असणऱ्या प्रत्येकाने भुरा वाचलाच पाहिजे. हे आत्मकथन वाचताना आपण कोणत्या मार्गाने आलो आणि आता कुठे आहोत, याचे सहज अवलोकन मनात होते.

     शरद बाविस्कारांच्या या ‘भुरा’ एका वाक्यात बद्दल सांगायचं असल्यास, असं सांगता येईल कि, जर कुणाचा मार्ग चुकला असेल तरभुरा’ त्याला योग्य मार्ग दाखवतो. तसेच योग्य मार्गावर असणाऱ्याला उर्जा आणि वेगहीभुरादेतो.


Bhura by lekhak Sharad Baviskar Marathi Book Bhura review introductio
Bhura by lekhak Sharad Baviskar Marathi Book Bhura review introductio


* 'भुरा' हे पुस्तक विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.

* 'द अल्केमिस्ट' या जगप्रसिद्ध पुस्तकाबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

* पुस्तकांसाठीच पुस्तक म्हणजे 'सतीश काळसेकर' यांचे 'वाचणाऱ्याची रोजनिशी' साठी येथे  क्लिक करा.

* 'खलील जिब्रान' यांची मुलांसाठीची जगप्रसिद्ध कवितेचा मराठी अनुवाद वाचण्यासाठी येथे क्लिक  करा.


No comments: