“तुमची मूलं ही तुमची नसतात........” या ओळीपासून सुरु होणारी ही कविता पालकांच्या अंतर्मनाला गदागदा हलवून प्रत्येक ओळीवर विचार करायला भाग पडणारी आहे. जगप्रसिद्ध कवी खलील जिब्रान यांच्या On Children या कवितेचा मराठी अनुवाद म्हणजे जीवनाचे अंकुर. मराठीमध्ये अनुवादित झालेली ही कविता 'ए. एस. नील' यांनी लिहिलेल्या नीलची शाळा ‘समरहिल’ या पुस्तकात घेतली आहे.
![]() |
| khalil jibran poems kavita on children aani and samarhil school book review in marathi |
'ए. एस. नील' यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या नीलची शाळा ‘समरहिल’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद 'हेमलता होनवाड' आणि 'सुजाता देशमुख' यांनी केला आहे. तर प्रस्तावना 'जोनाथन क्रोल' यांची आहे. प्रस्तावना आणि लेखकाचे मनोगत याच्या मध्ये ही प्रसिद्ध कविता घेतलेली आहे.
'खलील जिब्रान' यांनी लिहिलेल्या द प्रोफेट या संग्रहामध्ये On Children हि जगप्रसिद्ध कविता आहे. मूळ इंग्रजी भाषेतील या कवितेचा जीवनाचे अंकुर हा मराठी अनुवाद आहे. कविता अनुवादित असली तरी तिचा आत्मा आणि गाभा कायम राखल्या गेला आहे. त्यामुळे कवितेचा आशय आणि शब्दामागच्या भावना; भाषा बदलूनही वाचकांच्या मानला भिडतात. 'khalil jibran poems kavita on children aani and samarhil'
खलील जिब्रान यांच्याविषयी......
'खलील जिब्रान' यांचा जन्म 6 जानेवारी 1883 व मृत्यू 10 एप्रिल 1931 रोजी झाला. लेबनॉनी-अमेरिकन हे त्यांचे राष्ट्रीयत्व असून साहित्य, संगीत, शिल्पकला, तत्वज्ञान, चित्रकला या क्षेत्रात त्यांनी कार्य केले. द प्रोफेट ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती आहे. अंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या लेखनाची तुलना 'रवींद्रनाथ टागोरांशी' (गीतांजली) केली जाते. 'शेक्सपियर' आणि 'लाओत्झुनंतर' 'खलील जिब्रान' हा सार्वकालिक, सर्वाधिक खप असणारा तिसरा कवी आहे.
खलील जिब्रान यांच्या कवितेचा आणि समरहिल शाळेचा संबंध....
त्याचं साहित्य निर्विवाद उच्च प्रतीच आहे. मात्र उच्च प्रतीचा साहित्यिक या नात्याने हि कविता ‘समरहिल’ मध्ये घेतलेली नाही. तर 'ए. एस. नील' यांच्या विचारांना आणि ‘समरहिल’ च्या विषयाला समर्पक आणि चपखल बसणारी कविता आहे.
|
| khalil jibran poems on children and samarhil |
सरळधोपट मार्गाने शिक्षण पद्धती राबवणाऱ्या असंख्य शाळा आपल्या अवती भोवती आहेत. या शाळांमधून पोपटपंची पिढ्या तयार केल्या जात आहेत. ज्या हस्ताक्षर, स्पेलिंग आणि अपूर्णांकाच्या बाबतीत तरबेज असतील, परंतु नवनिर्मिती आणि सर्जनशीलतेच्या परीक्षेत नक्कीच मागे पडतील. परीक्षा पध्दती आडून भीतीयुक्त व्यवस्था आणि पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा याचं ओझ मुलं आपल्या बालमनावर कायम वाहत असतात. त्यामुळे त्यांच्यातील नवनिर्मितीचे अंकुर फुलण्याआधीच कोमेजून जातात. त्यातून मुलं ‘समस्याग्रस्त’ आणि ‘असमाधानी’ बनतात.
वर्तमानातील आनंदी जीवन ते जगू शकत नाहीत.
त्यामुळे त्यांच्या स्वभावात आणि वागण्यामध्ये खूप फरक पडतो. यालाच आपण ‘बिघडलेलं
मुल’ अस म्हणतो. 'नीलची' मात्र ठाम श्रद्धा आहे, की कोणतच मुल बिघडलेलं किंवा वाईट
नसतं, त्याच्या या अवस्थेला शाळा आणि पालक जबाबदार असतात. पालक हेच जर
‘समस्याग्रस्त’ आणि ‘असमाधानी’ असतील तर ते त्यांच्या मुलांना निरोगी जीवन देवू
शकत नाहीत.
मुलांमध्ये स्वातंत्र्य, स्वयंशासन, सर्जनशीलता ही मुल्ये रुजवून त्यांना समाधानी आयुष्य देण्यासाठी 'नील' यांनी ‘समरहिल’ शाळा 1921 साली सुरु केली. मुलांना मुलांसारख वागण्याची मुभा मिळावी यासाठी त्यांनी सर्व प्रकारची शिस्त, मार्गदर्शन, सूचना, नैतिकतेची शिकवण आणि धार्मिक शिक्षणाला त्यांनी फाटा दिला.
शाळेच्या मूळ तत्वाविषयी
सांगतांना 'नील' म्हणतात “मुलाप्रमाणे शाळेने बदलायचं, शाळेत फीट होण्यासाठी मुलान
बदलायचं नाही. ही आमची मूळ कल्पना होती, शाळेनं मुलात मिसळायच, मुलाने शाळेत
नाही.”
खलील जिब्रान यांच्या कवितेविषयी.........
![]() |
| khalil jibran poems kavita on children and samarhil |
“तुमची मूलं ही तुमची नसतात........” या ओळीपासून सुरु होणारी ही कविता पालकांच्या अंतर्मनाला गदागदा हलवून प्रत्येक ओळीवर विचार करायला भाग पाडते. मुलांवर पालकांचा मालकी हक्क नसून, मुलांना त्यांच स्वतंत्र अस्तित्व आहे. स्वतंत्र विचार आहे. तुम्ही फार तर त्यांच्या शरीराचा सांभाळ करा. परंतु त्यांच्या मनावर आणि आत्म्यावर मालकी हक्क सांगून त्यांना आपल्या मनाप्रमाणे घडविण्याचा हट्ट धरून त्यांना भूतकाळाकडे ओढण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही मुलाचे पालक असले तरी तुम्हाला तसा कोणताही अधिकार नाही. असे 'जिब्रान' आपल्या कवितेतून सांगतात.
मुलं ही निखळ चैतन्याचा
प्रवाह असतात. आणि प्रवाह तर सतत समोर जात असतो. तो मागे फिरत नाही. त्यामुळे
तुम्हीच त्याच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करा. कारण तो तुमच्या स्वप्नाच्याही
पलीकडे आहे. त्याला अडकाठी घालू नका. तर प्रवाहाला पुढे जाण्यासाठी स्वागत करा.
तेच तुमचं कर्तव्य आहे. असे खलील जिब्रान आपल्या कवितेतून पालकांना उद्देशून सांगतात.
नीलची शाळा ‘समरहिल’पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
‘On Children’ हि
कविता इंग्रजी मधून वाचण्यासाठी क्लिक करा.


.jpg)
No comments:
Post a Comment