द अल्केमिस्ट The Alchemist by Paulo Coelho book review in Marathi

     साधारण १८५ पानांचं, वजनाला एकदम हलकं असलेल, दोन ते तीन दिवसात वाचून संपवता येईल असं हे पुस्तक. परंतु याच पुस्तकाने जगभरातल्या वाचकांना आकर्षित केलं आहे. पुस्तकाची लेखणशैली साधी पण तितकीच उद्बोधक आहे. त्यामुळे ते वाचकांच्या मनाचा ठाव घेते.                     


The Alchemist by Paulo Coelho book review in Marathi
The Alchemist by Paulo Coelho book review in Marathi


द अल्केमिस्ट पुस्तकाची निर्मिती आणि प्रवास.                                      

      “तुम्हाला जेंव्हा मनापासून काहीतरी हंवं असतं तेंव्हा ते तुम्हाला प्राप्त करता यावं म्हणून संपूर्ण विश्व एकवटतं.” हे वाक्य आहे जगप्रसिद्ध कादंबरी द अल्केमिस्ट मधील. लपलेल्या खजिन्यापर्यंत पोहोचणे हीच आपली नियती आहे. असे वाटणाऱ्या स्पेन मधील एका मेंढपाळ मुलाची ही कथा आहे. या कादंबरीने म्हणजे ‘द अल्केमिस्ट’ ने जगभरातील वाचकांच्या मनाला अजूनही भुरळ घातलेली आहे. 

     १९८८ साली प्रकाशित झालेल्या अल्केमिस्ट चा सुरवातीचा प्रवास अत्यंत खडतर होता. पहिल्या आवृत्तीच्या दोन प्रती विकायला तब्बल सहा महिने लागले. त्यानंतर पुढची प्रत विकायला किती काळ गेला असेल कोण जाणे. असं लेखक 'पाउलो कोएलो' प्रस्तावनेत सांगतात. परंतु नंतर अल्केमिस्टने अशी काही जादू केली, की ते सर्वाधिक खपाच्या यादीत अग्रस्थानी जाऊन पोहोचलं. तब्बल ऐंशीहून अधिक भाषांमध्ये हे पुस्तक अनुवादित झालं आहे.


The Alchemist by Paulo Coelho book summery, in Marathi


पुस्तकात नेमकं काय आहे?   

    अल्केमिस्ट मध्ये सॅंटिआगो नावाच्या तरुणाची कथा आहे. इजिप्तच्या piryamid जवळ लपवलेल्या खजिन्याची जागा दाखवायला एक मुल त्याच्या स्वप्नात येत. पण त्याला आधीच जाग येते. असं दोन वेळा होत. आपल्या स्वप्नाचा अर्थ लावून, तो लपवलेल्या खजिन्याचा शोध घेण्याचं ठरवतो. आणि स्पेन पासून ते इजिप्शियनचा वाळवंट, असा त्याचा साहसी प्रवास सुरु होतो.

     प्रवासामध्ये त्याला अनेक पात्र भेटतात. जी त्याला जीवनाचे महत्त्वाचे धडे शिकवतात. त्यामध्ये तारीफामध्ये राहणारी आणि स्वप्नाचा अर्थ सांगणारी म्हातारी. स्वतःला सालेमचा राजा सांगणारा बुद्धिमान वृद्ध; जो त्याचं नाव मेल्कीझीडेक सांगतो. लुटणारा नवागत. काचसामान विकणारा दुकानदार, इंग्लिश गृहस्थ, सारवान, ओआसीस मधली सुंदर तरुणी फातिमा, वृध्द प्रमुख. यांच्यामुळे सॅंटिआगोचा प्रवास सुंदर आणि प्रगल्भ होतो. आणि वाचकांना खिळवून ठेवतो.

     सर्वात शेवटी भेटतो तो रहस्यमयी किमयागार. ज्याने त्याला हृदयाशी संवाद साधायला शिकवलं. सॅंटिआगोने त्याला आपला गुरु केला. जगदात्मा, ईश्वरात्मा, आणि आपला आत्मा हे वेगळे नाहीत. तर त्यांचा परस्पर संबंध असून ते एकच आहेत. याचं ज्ञान त्याला याच किमयागारामुळे होते. बुद्धिमान राजाकडून सॅंटिआगोला कळते की, “तुम्हाला जेंव्हा मनापासून काहीतरी हंवंस असतं तेव्हा ते तुम्हाला प्राप्त करता यावं म्हणून संपूर्ण विश्व एकवटतं.” ज्यामुळे सॅंटिआगोचा त्याच्या मार्गावरचा विश्वास अधिक घट्ट होतो.

The Alchemist by Paulo Coelho book review in Marathi
The Alchemist by Paulo Coelho book review in Marathi


    स्वप्नातील लपलेला खजिना शोधणे ही आपली नियती मानून त्यापर्यंत पोहचण्यासाठी केलेल्या प्रवासामुळे सॅंटिआगोचं जीवन तर समृध्द होतच. सोबतच पुस्तक वाचतांना वाचकही आपल्या जीवनात अंतर्मुख होतो. आपली स्वप्ने आणि उद्दिष्ट प्राप्त करण्याची जीद्द, त्या प्रवासासाठी हवी असणारी उर्जा द अल्केमिस्ट मधून भरभरून मिळते. इजिप्तच्या piryamid जवळ गेल्यावर सॅंटिआगोला लपवलेला खजिना मिळत नाही. उलट त्याला कळतं, की या प्रवासाची सुरवात स्पेन मधील ज्या चर्च पासून त्याने केली होती, खजिना तिथेच आहे.

     परत आल्यावर त्याला तो खजिना मिळतोही. परंतु त्याचं महत्व त्याला गौण वाटतं. कारण शेवटी त्याला भौतिक संपत्तीपेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान खजिना सापडलेला असतो. जो त्याला मौल्यवान धातूपेक्षा कितीतरी पटीने जास्त मोलाचा वाटतो.

     सॅंटिआगोची हि कथा सर्व वयोगटातील आणि सर्व स्तरातील प्रत्येकासाठी वाचनीय अशी आहे. ती एकप्रकारे आपलं प्रतिनिधित्व करते. वाचकाला विचार करायला, वर्तमानात जगायला, स्वप्नाचा आणि स्वतःचा शोध घ्यायला, तसेच स्वतःच्या मार्गावर दृढविश्वास आणि धैर्य ठेवायला बळ देते.


 अल्केमिस्ट हे पुस्तक विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.


 "खर तर आपण जेंव्हा बिकट परिस्थितीतून जात असतो तेंव्हा फार तीव्रेतेने निश्चय करत असतो. मात्र जेंव्हा परिस्थिती सुसह्य होत असते, तेंव्हा आपण निश्चायातील तीव्रता विसरतो आणि फक्त निश्चयाचीच आठवण ठेवतो. तीव्रतेशिवाय निश्चय वांझोटा असतो." उपरोक्त ओळी 'शरद बाविस्कर' लिखित भुरा या आत्मकथानातील आहेत.

भुरा या पुस्तकाचा review वाचण्यासाठी येथे क्लिक करा.



No comments: