लोकप्रभा दिवाळी अंक 2023 Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi

     गिरीश कुबेर यांनी संपादित केलेला यंदाचा लोकप्रभा दिवाळी अंक वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारा आहे. एकच विषय घेण्यापेक्षा एकाच अंकात विविध विषयावर त्या विषयातील जाणकार लोकांनी केलेले लिखाण वाचायला मिळते. त्यामुळे हा अंक म्हणजे दिवाळीच्या फराळा सोबत वैचारिक लिखाणाची मेजवानी आहे.

     संपादक या नात्याने अंकाला गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत ते म्हणतात की, " एका लेखात कुठलाही विषय परिपूर्ण होऊ शकत नाही, परंतु एक लेख त्या विषयाची जिज्ञासा निर्माण करू शकते." गिरीश कुबेर यांनी लिहिलेली प्रस्तावना खास आहे. वाचतांना त्याचा अनुभव येतो. ती एकप्रकारे काव्यात्मक गद्य आहे. 

Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi
Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi


लोकप्रभा  2023 

संपादक : गिरीश कुबेर


'लोकप्रभा' मधील सर्वच लेख वाचनीय असून त्यातील काही विशेष आवडलेले पुढीलप्रमाणे आहेत.

     टीव्हीवर नेहमी पाहायला मिळणारे, हिंदीमध्ये डब होऊन आलेले सिनेमे म्हणजे साउथचे सिनेमे असा आपला समज. ते आपल्याला खूप आवडतातही. नुसतेच आवडत नाहीत तर, युथमध्ये साउथच्या अभिनेत्यांची तुफान क्रेझ आहे. पुष्पा, बाहुबली, KGF, आरआरआर असे कितीतरी सिनेमे ज्यांनी बॉलीवूड समोर मोठे आव्हान उभं केलं आहे.

     साउथचा सिनेमा ही सामान्य लोकांमध्ये असलेली ओळख म्हणजे ढोबळमानाची. खरतर हे सिनेमे वेगवेगळ्या प्रांतीय भाषेतले असतात. कन्नड, तमिळ, तेलगु, त्याचप्रमाणे मल्याळम या वेगवेगळ्या भाषेत ते तयार होतात. इतर प्रांतीय भाषेपेक्षा केरळ मधील मल्याळम भाषेतील सिनेमे त्यामानाने खूपच आशयगर्भित आणि प्रगल्भ असतात. त्याला कारण म्हणजे, केरळमधील साहित्य, राजकीय, सामाजिक परिस्थितीचा त्या सिनेमावर असलेला प्रभाव. तसेच सशक्त कथानक आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर या सिनेमाने वेगळी वाट निर्माण केली आहे.


Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi
Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi

     असं असलं तरी मल्याळम सिनेमा उपेक्षितच होता. ओटीटी या तीन अक्षरामुळे तो प्रांतीय भाषेचे बंधन तोडुन भारतभर पसरला. आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरला. लोकाश्रय मिळालेल्या या मल्याळम सिनेमाचा प्रवास आणि कलाकारांच्या कामांची ओळख करून देणारे सलग तीन लेख या अंकात वाचायला मिळतात.

लोकप्रभा 2023

👉 मल्याळम सिनेमात आशय हाच हिरो!  - प्रसाद आर्दाळकर

     1930 साली जे. सी. डनियल यांनी पहिला मल्याळम सिनेमा तयार केला. तेंव्हापासून सुरु झालेल्या या प्रवासात अनेक चढ उतार आले. आर्थिक संकट आली. त्यातूनही सावरत त्याने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. प्रांतीय भाषेची मर्यादा असलेल्या या सिनेमाला अनेकांनी आपली कसब पणाला लावून मोलाचे योगदान दिले. तर काही कलाकृती मैलाचा दगड ठरल्या.


Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi
Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi

     इथला प्रेक्षकही चोखंदळ आहे. मनोरंजनाच्या नावाखाली काहीही खपवून घेत नाही. सुपरस्टार अभिनेत्याच्या सिनेमाचे कथानक कमकुवत असेल तर तो त्याकडे पाठ फिरवतो. वर टीकाही करतो. त्यामुळे हा सिनेमा व्यक्तिकेंद्रित न होता सिनेमाचा आशय हाच त्याचा हिरो ठरतो.

     प्रसाद आर्दाळकर यांनी मल्याळम सिनेमा आणि त्याचा प्रवास बारकाव्यासाहित आपल्यासमोर ठेवला आहे.

लोकप्रभा 2023

👉 दहा मल्याळी सिनेरत्ने!  - रोहन नामजोशी

     सिनेमाची आवड असणाऱ्या कोणालाही, तुमच्या आवडीचे दहा सिनेमे कोणते? असा प्रश्न विचारला तर, नेमकं उत्तर देण जरा कठीणच! त्यातही सशक्त कथानकाची परंपरा असलेल्या मल्याळी सिनेमातून निवडणे आणखीनच कठीण काम.

Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi
Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi

     रोहन नामजोशी यांनी मात्र हि किमया साधली. या सिनेमात त्यांनी दहा मल्याळम सिनेमांची ओळख करून देत, ते पाहण्याचा आग्रह केला. हे दहा सिनेमे निवडतांना त्यांनी सिनेमाचे कथानक, आशय, मांडणी, अभिनय आणि निर्मिती कौशल्य या सर्व पातळ्यावर तपासणी करून मल्याळी सिनेमाची प्रगल्भ परंपरा पुढे कायम राखली.

लोकप्रभा 2023

 

👉  अभिनयातील जिवंत दंतकथा.  - किशोर अर्जुन

     अभिनय क्षेत्रात पदार्पणाचा त्याचा पहिलाच सिनेमा दणक्यात आपटला. अभिनय आपलं क्षेत्रच नाही, याची त्याला जाणीव झाली. एकतर सिनेमातील हिरो शोभावा असा कोणताच त्याचा लुक्स नाही. त्यातही टाळूपर्यंत पसरलेले भलेमोठे कपाळ, गुढरम्य असामान्य डोळे या उणीवा सोबतीला असून प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मुलगा या नात्याने अभिनय क्षेत्रात उतरला खरा. परंतु पहिल्याच सिनेमाला आलेल्या मोठ्या अपयशाने त्याच्या आत्मविश्वासाचा पार चुरा-चुरा झाला.

Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi
Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi

     पुन्हा अभिनयाची चुकूनही वाट धरायची नाही, असं पक्क ठरवून त्याने शिक्षणासाठी थेट परदेशाची वाट धरली. सात वर्षे सिनेमा आणि अभिनयापासून लांब राहिलेला हाच अभिनेता पुढे मल्याळम सिनेमाचा मुख्य चेहरा झाला. ही गोष्टं आहे द्रोणाचार्याचा शिष्य एकलव्याची. ही गोष्टं आहे इरफान खान चा शिष्य फहाद फाजिल याची. जी किशोर अर्जुन यांनी रंजक पद्धतीने आपल्या समोर मांडली आहे.

लोकप्रभा 2023

👉   माहीत नसलेला ए. आर. रहमान!  - संपदा सोनवी

     ए. आर. रहमान हे नाव माहित नाही, असा माणूस शोधूनही सापडणार नाही. इतकं ते नाव प्रसिद्ध आहे. ऑस्कर अवार्ड प्राप्त कलाकृती मध्ये योगदान असलेला हा भारतीय संगीतकार. त्यांचे गाणे लहानमोठे सहज गुणगुणत असतात. एवढं मोठ यश आणि लोकप्रियता एखाद्याच संगीतकाराला मिळते.

Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi
Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi

     लेखिका संपदा सोनवी यांनी ए. आर. रहमान यांच्याविषयी लिहिलेल्या या लेखात त्यांच्या यश किंवा लोकप्रियता याची माहिती देण्याची औपचारिकता केली नाही. त्याउलट ए. आर. रहमान यांनी भाषिक सिनेमासाठी केलेलं काम, प्रयोग, योगदान आणि त्याचं महत्व अतिशय प्रकर्षाने आपल्या समोर आणलं आहे. त्यामुळे हा लेख म्हणजे, 'माहित नसलेला ए. आर. रहमान' असाच आहे.

लोकप्रभा 2023

👉  एका राजकुमाराची मुशाफीरी.  - नयन डोळे 

     अभिनयाच्या जोरावर स्वतःची दखलपात्र ओळख आणि वेगळी वाट निर्माण करणारे अनेक अभिनेते बॉलीवूड मध्ये आहेत. नसरुद्दिन शहा, इरफान खान, मनोज वाजपेयी, केके मेनन, नावाजुद्दिन सिद्दकी, पंकज त्रिपाठी यांचा अभिनय वेगळ्या धाटणीचा आहे. एखाद्या सिनेमातील भूमिका लोकांना खूप आवडली म्हणून त्याच लयीतले सिनेमे निवडून अभिनय करायचा. या सरळधोपट मार्गाने न चालता सतत प्रयोगशील असणारे अभिनेते म्हणून या सर्वांची ओळख आहे. याच ओळीतला पुढचा अभिनेता म्हणजे राजकुमार राव!

Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi
Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi

     सिनेमाची कहाणी आणि व्याक्तीरेखेमागची कहाणी याची कल्पना करून पटकथेत न दाखवलेलं आयुष्य जगत अभिनय करायचा. माणसासारखा माणूस उभा करायचा. अभिनयाचा अविर्भाव न आणता त्यामध्ये पात्रानुसार लवचिकता ठेऊन प्रेक्षकांशी खेळत राहणारा अभिनेता म्हणजे राजकुमार राव. सूक्ष्म निरीक्षणातून त्याच्या कामातील बारकावे टिपत नयन डोळे यांनी आपल्या समोर ठेवले आहेत. 

लोकप्रभा 2023

👉 तथागताच्या वाटेवरील भ्रमंती.   - डॉ. राधिका टिपरे

     भगवान बुद्धाचे भारताबाहेर असलेले जन्मठिकाण सध्या नेमके कुठे आहे? हा विषय अनेकांसाठी रहस्य आणि कुतूहल बाळगून आहे. या रहस्याचा संदर्भासहित उलगडा डॉ.राधिका टिपरे यांनी या लेखात केला आहे.

Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi
Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi

     बौद्ध धर्माची तीर्थस्थळे अनेक देशात आहेत. त्यांचे ऐतिहासिक आणि पौराणिक विशेष असे महत्व आहे. त्यामध्ये श्रीलंका, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, भूतान, लाओस, व्हिएतनाम, चीन, तिबेट, मंगोलिया, इत्यादी ठिकाणच्या बौद्ध तीर्थस्थळांची सविस्तर माहिती या लेखातून मिळते. तसेच त्या ठिकाणाचे पुरातन महत्व,  वास्तुशैली, स्थापत्यशैली, सोबतच महत्वाचे संदर्भही सांगितले आहेत. काही जातकथा आणि दंतकथाचाही उल्लेख येतो. नेहमीसाठी संग्रही ठेवावा असा हा लेख जिज्ञासू लोकांसाठी एक पर्वणीच आहे.

Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi
Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi

लोकप्रभा 2023

👉  डिजिटल जमान्यात मराठी 'मुमुर्षू' आहे? - अरूंधती आर. जे.

     भाषेचा विस्तारित जाणारा शब्दसाठा म्हणजे हा त्या भाषेवरील दुसऱ्या भाषेचे जणू अतिक्रमणच! मध्ययुगीन काळापासून मराठी भाषेवर अनेक भाषांनी अतिक्रमण केले. अरबी, फारसी, पोर्तुगीज, फ्रेंच, संस्कृत, कन्नड, आणि इंग्रजी इत्यादी भाषेतील शब्द मराठी भाषेत आले आणि मिसळले.

     इंग्रजी भाषेचे अतिक्रमण तर अजूनही सुरूच आहे. इंटरनेटच्या वापरामुळे डिजिटल काळात ते अधिक वाढत गेले. त्याउलट सोशल मीडियातील ऑडीओ, व्हिज्युअल, कंटेंट मुळे डिजिटल काळात मराठीला सुगीचे दिवसही आलेत. परंतु याच ऑडीओ, व्हिज्युअल कंटेंट मुळे वाचन आणि लिखाण कमी होत चालले, हाही त्याचा दुष्परिणामच.


Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi
Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi

     गेल्या 100 वर्षात अनेकांनी मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त केली, की खरचं मराठी भाषा मारण्याची इच्छा बाळगणारी आहे का? याच विषयावरची चर्चा आणि मराठी भाषेचे भविष्य याची मांडणी लेखिका अरूंधती आर. जे. यांनी या लेखात केली आहे.

लोकप्रभा 2023

👉  फ्रेंच भाषासुन्दरीचा अनुनय.    - आशुतोष उकिडवे

     "एखादी भाषा शिकायची असेल तर त्या समाजाची संस्कृती, चालीरीती, परंपरा जाणून घ्यावी लागते. कारण कोणत्याही भाषेची पालमूळ ही त्या समाजाच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली असतात." प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या लिखाणातील हे विचार असून, याच विचारापर्यंत नेणारा हा लेख आशुतोष उकिडवे यांनी लिहिला आहे.

Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi
Lokprabha Diwali Ank 2023 Marathi Diwali Ank 2023 Review In Marathi

     फ्रेंच भाषा शिकण्याची अपघाताने लागलेली ओढ. त्यासाठी केलेले प्रयत्न. फ्रेंच भाषेची बाराखडी ते तिच्यावर मिळवलेले प्रभुत्व, हा प्रवास करतांना लेखकाला आलेले अनुभव या लेखातून वाचायला मिळतात. आपणही एखादी भाषा शिकून घ्यावी, असा विचार मनात आला तर नवल नाहीच. सोबत फ्रेंच लोकांच्या सामाजिक सभ्यतेचे दर्शन लेखकाच्या अनुभवातून पाहायला म्हणजे वाचायला मिळते.

लोकप्रभा 2023

लोकप्रभा दिवाळी अंक विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकप्रभा दिवाळी अंक 2023 Lokprabha Diwali Ank 2023


  • ओलीम्पिकचा (खर्चिक) खेळ...!     - सिद्धार्थ खांडेकर
  • चक्रमवीर                                      - आसिफ बागवान
  • बर झालं भाई...                              - अमोल परांजपे
  • ...आणि निवडणुका                        - पंकज फणसे
  • मेजवानी 'फूड शो' जची!                  - भक्ती बिसुरे
  • हिंदुस्थानी संगीतातील जुगलबंदी    - चैतन्य कुटे
  • संगीतामधील भगिनीभाव               - प्राची पाठक
  • ग्रामीण महिलांची खबरबात            - रेश्मा भुजबळ
  • बिनग्ल्यामार युगातलं क्रिकेट         - प्रभाकर बोकील
  • त्या दोघी!                                      - हिनाकौसर खान
  • वाघ, विनाशाकडून समृद्धीकडे!       - श्रीरंग फडके
  • लक्तरलेले वैभवच जणू                 - सुहास सरदेशमुख
  • वार्षिक राशिभविष्य                       - सोनल चितळे 


लोकप्रभा दिवाळी अंक विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.


शब्दोत्सव (लोकमत) दिवाळी अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.





No comments: