गोष्ट पैशापाण्याची' : अर्थसाक्षरतेचा 'प्रफुल्ल' प्रवास
प्रत्येक मराठी घरात ज्याची अनेक पारायणे व्हावीत, समूहवाचन व्हावं, यातील प्रत्येक लेखावर चर्चा करावी, विशेष प्रसंगी भेट म्हणून द्यावं, असं पुस्तक म्हणजे ‘गोष्ट पैशापाण्याची.’
![]() |
| गोष्ट पैशापाण्याची Motivational book in Marathi प्रेरणादायी पुस्तक by Prafulla Wankhede |
गोष्ट पैशापाण्याची Motivational book in Marathi प्रेरणादायी पुस्तक by Prafulla Wankhede
नौकरी आणि नंतर व्यवसाय करतांना आलेल्या अडचणी, कठीण प्रसंग, आव्हाने आणि त्यावर मात करतांना आलेले अनुभव, या सर्वांतून आपण जे शिकलो ते इतरांना सांगावे. या उदात्त हेतूने लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी ‘सकाळ’ साठी ‘गोष्ट पैशापाण्याची’ लेखमाला लिहिली.
ही लेखमाला म्हणजे एकप्रकारचे सामाजिक प्रबोधनच! तेही अर्थसाक्षरता या विषयावर. ‘सकाळ प्रकाशनाने’ ही लेखमाला ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तक रूपात प्रकाशित केली. त्यामुळे मराठी माणसात अर्थसाक्षरता रुजायला आणि गती मिळायला मदत झाली.
प्रत्येक मराठी घरात ज्याची अनेक पारायणे व्हावीत, समूहवाचन व्हावं, यातील प्रत्येक लेखावर चर्चा करावी, विशेष प्रसंगी भेट म्हणून द्यावं, असं पुस्तक म्हणजे ‘गोष्ट पैशापाण्याची.’ या पुस्तकात खरंच गोष्टी आहेत, ज्या लघुबोधकथा वाटाव्या, खूप सध्या आणि सरळ पद्धतीने मांडलेल्या. व्यावसायीक, सामाजिक, जीवनात लेखकाला आलेले ते अनुभव आहेत.
![]() |
| गोष्ट पैशापाण्याची Motivational book in Marathi प्रेरणादायी पुस्तक by Prafulla Wankhede |
गोष्ट पैशापाण्याची Motivational book in Marathi प्रेरणादायी पुस्तक by Prafulla Wankhede
आपल्याही जीवनात लहान-मोठे, बरे-वाईट प्रसंग घडतात. ते येतात आणि निघून जातात. त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु या प्रसंगातूनही आपण खूप काही शिकू शकतो, याबद्दल लेखकाचे निरीक्षण कमालीचे आहे. या गोष्टी वाचतांना त्यात कुठेही अतिशयोक्ती किंवा बडेजावपणा दिसत नाही. वाचणारा त्याभोवती खिळून राहतो आणि पाने सहज पालटली जातात.
सोबतच आपण गिरवायला लागतो आर्थिक साक्षरतेचे धडे. जे त्या गोष्टींच्या मागेपुढे
लेखकांनी पद्धतशीरपणे मांडलेले आहेत. त्यामुळे ते आपल्याला सहज पटतात आणि रुचतातही.
एखाद्या क्षेत्रात नव्याने सुरवात करणे, त्यातील स्पर्धेत टिकून राहणे आणि सोबतच आपली वेगळी ओळख निर्माण करून यशाचे शिखर सर करणे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या शिखरावर टिकून राहने व आपला यशाचा रथ अधिकाधिक समोर नेत राहणे, या सर्व टप्यांवर हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.
![]() |
| गोष्ट पैशापाण्याची Motivational book in Marathi प्रेरणादायी पुस्तक by Prafulla Wankhede |
गोष्ट पैशापाण्याची Motivational book in Marathi प्रेरणादायी पुस्तक by Prafulla Wankhede
एकवेळ यश आणि पैसा मिळवणे सोपे आहे पण ते टिकवणे आणि वाढवणे त्यापेक्षा कठीण. त्यासाठी डोक्यात हवा न जावू देता, जमिनीवर पाय टिकून असणे गरजेचे आहे.
त्यासोबत आर्थिक
नियोजन, कामातील आणि व्यवहारातील शिस्त, समर्पण, अविरत कष्ट, कामाप्रती निष्ठा जशी
गरजेची आहे, तशीच संवेदनशीलता, माणुसकी, नात्यातील ओलावा यातील गुंतवणूकही तितकीच
महत्वाची आहे. याबद्दल लेखकांनी उदाहरणासहीत मुद्देसूद मांडणी केली आहे.
हे पुस्तक कोणी वाचावं तर, लहान-मोठे सर्व, स्त्री-पुरुष कोणीही असो, गृहिणी असो, विध्यार्थी असो, किंवा व्यवसाय, नौकरी, कोणत्याही क्षेत्रातील प्रत्येकाने वाचावं आणि संग्रही ठेवावं, भेट द्यावं असं हे पुस्तक आहे.
अशी पुस्तके आपल्याकडे कमी येतात. परंतु लेखक प्रफुल वानखेडे आणि सकाळ प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित करून मराठीजनात अर्थसाक्षरता वाढण्याला हातभार लावला त्याबद्दल त्यांचे आभार.
https://www.instagram.com/manish_surve_96/
जे. एन. यु. मधील प्राध्यापक शरद बाविस्कर यांनी लिहिलेल्या 'भुरा' विषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
![]() |
| Bhura by lekhak Sharad Baviskar Marathi Book Bhura review introduction |
जगप्रसिद्ध पुस्तक द अल्केमिस्ट (मराठी अनुवाद) याविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
![]() |
| The Alchemist by Paulo Coelho book review in Marathi |





No comments:
Post a Comment