'दीपोत्सव' हा लोकमतचा दिवाळी अंक. 2003 पासून सातत्याने येणाऱ्या दीपोत्सवचे हे विसावे वर्ष. यंदाचा दीपोत्सव सालाबादप्रमाणे श्रीमंत नितीमुल्ये, देखणे रूप, आणि लखलखीत आहे. त्याहीपेक्षा यंदाच्या अंकात घेतलेला विषयच खूप युनिक आहे. 'पुरुष' विषय तसा पाहायला साधा, सोपा, सर्वांना परिचित असलेला. अस असलं तरी त्याबद्दल कुणी फारसं लिहित किंवा बोलत नाही.
.jpg) |
| Marathi Diwali Ank 2023 lokmat Dipotsav 2023 |
आई साठीच खूप काही वाचायला ऐकायला मिळेल. वडील मात्र उपेक्षित. स्त्रियांसाठीच लिखाण साहित्याच्या सर्व प्रकारात भरपूर प्रमाणात वाचायाला मिळते. पुरुषांचा मात्र अनुशेष कायम.
ज्याचा उलगडा देवालाही कधी करता आला नसेल त्या स्त्री मनाला जाणून घेण्याचा प्रयत्न नेहमी होतो. पण पुरुषांच्या मनात कधीच कोणी डोकावत नाही. हाच अनुशेष भरून काढण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून 'पुरुष' हा विषय निवडला गेला. लोकांपुढे अस काही ठेवायचं , की त्यांनी ते कधीच वाचलं नसेल. त्यामुळे यंदाचा अंक आणि त्याचा विषय युनिक आहे. कारण पुरुषांच्या मनात, त्यांच्या खाजगी आयुष्यात भटकून येण्याचा प्रवास म्हणजे यंदाचा 'दीपोत्सव.'
त्यासोबत काही लेख हे वेगळ्या विषयावर आहेत. त्यामध्ये मालेगावची फिल्म इंडस्ट्री, शिक्षक आणि येणारा अत्याधुनिक काळ, Artificial Intelligence, सोशल मिडिया अश्या विषयांवरचं कसदार लिखाण वाचायला मिळेल.
'दीपोत्सव' (लोकमत) 2023
संपादक : अपर्णा वेलणकर
पुरुष लेखांची चित्रे : चंद्रमोहन कुलकर्णी
कला संपादन : विवेक रानडे
पाने : 256 मूल्य : 299
'दीपोत्सव' मधील सर्वच लेख वाचनीय असून त्यातील काही विशेष आवडलेले पुढीलप्रमाणे आहेत.
👉 अपना स्टोरी अपून बेचेगा - मेघना ढोके
.jpg) |
| Marathi Diwali Ank 2023 lokmat Dipotsav 2023 |
बॉलीवूड प्रमाणे मालेगावला असलेली फिल्म इंडस्ट्री म्हणजे मॉंलीवूड. या मॉंलीवूडचा Fan Follower संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात आहे. विनोद निर्माण करून लोकांना खळखळून हसवणे हाच धागा पकडून Content तयार केले जातो. निर्माते, दिग्दर्शक, लेखक, नायक, खलनायक, गायक, संगीतकार, सर्व काही स्थानिकच. सवांद आणि गाणेही स्थानिक भाषेतील त्यामुळे लोकांना मॉंलीवूड आपलंस वाटतं.
.jpg) |
| Marathi Diwali Ank 2023 lokmat Dipotsav 2023 |
छोटूदादा उर्फ शफिक शेख हा मॉंलीवूड इंडस्ट्रीचा अफाट लोकप्रियता लाभलेला चेहरा आहे. त्यासोबतच आणखी काही व्यक्तिरेखा खूप गाजल्या. बाबू लोच्या उर्फ अक्रम खान, छोटूच्या दोस्ताची भूमिका असलेला गण्या टोपी उर्फ अजय दळवी अशी काही पत्रे इतकी गाजली कि स्थानिकही त्यांचं खरं नाव विसरले.
सोशल मिडिया आणि युट्युबच्या काळात मॉंलीवूडला सोन्याचे दिवस आले. मिलियन बिलियन व्ह्यूज आणि लाखात सस्क्राईबर्स ही लोकप्रियता तर मिळालीच सोबत पैशांचा पाऊस. जो प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण करू शकतो.
आज मॉंलीवूडचं दिसणार यश आणि लोकप्रियता डोळे दिपवणारी असली तरी, हे सर्व सहजासहजी घडलं नाही. त्यामागे खूप मोठा संघर्ष आहे. त्याग, परिश्रम आणि निष्ठा आहे. कधी अपयश, कधी नैराश्य आणि अफाट पागलपन आहे. प्रत्येक पात्राची आपली खास अशी एक स्टोरी आहे.
'अपनी स्टोरी अपून बेचेगा' हि अख्या मालेगावात भटकून शोधलेली मालेगावच्या युट्युबर्सची आणि इन्फ़्लुएन्सर्सची मेघना ढोके यांनी दीपोत्सव मध्ये लिहिलेली कहाणी आहे.
दीपोत्सव (लोकमत) - 2023
👉 शिक्षकांनो बदला आणि (बि) घडा! - सचिन उषा विलास जोशी
वर्षानुवर्षे पारंपारिक पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शाळा, शिक्षक, आणि संस्थाचालकांपुढे आता नवीन शैक्षणिक धोरण तसेच अत्याधुनिक युगाकडे नेणारे Artificial Intelligence बदलत्या काळाचे निशाण घेऊन उभे आहे.
.jpg) |
Marathi Diwali Ank 2023 lokmat Dipotsav 2023
|
सोशल मिडीयाचा प्रभाव गावखेड्यापर्यंत सर्वच स्तरातील मुलांवर पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या हाताला मोबाईल चिकटला तो कायमचा. येणारा काळ हा त्यांचा स्क्रीन टाईम आणखी वाढवणारा असेल. Chat-GPT आणि AI च्या विविध टूलमुळे मुलांना कोणत्याही विषयाचे ज्ञान (माहिती) एका Prompt वर मिळते. सोबत रोबो टीचर्सही येतील. त्यामुळे या मुलांना शिकविण्याची जबाबदारी पार पडणे हे शिक्षकांसाठी आव्हानात्मक ठरत जाणारे आहे.
खरं तर यांना संकट न मानता संधी म्हणून पाहायला हवं. लर्निंग बरोबरच अनलर्निंग, इलार्निंग संकल्पना समजून घेत भविष्यात उत्तम शिक्षक कसे होता येईल, याबाबत मार्गदर्शक ठरतील अशा महत्वाच्या टिप्स सचिन उषा विलास जोशी यांनी या लेखात दिलेल्या आहेत.
👉 मर्दानगीची कटकट - अनुराग कश्यप यांची मुलाखत
मुलाखतकार - संजय आवटे
.jpg) |
| Marathi Diwali Ank 2023 lokmat Dipotsav 2023 |
"भीतीतून हिंसा जन्माला येते, प्रतिवाद करता येत नाही, तेंव्हा हिंसा जन्माला येते. असुरक्षिततेतून हिंसा जन्माला येते. आणि असुरक्षित माणूस पहिल्यांदा हिंसेचा वापर करतो, तो कमजोर माणसावर. एखाद्या दुबळ्यावर हल्ला केल्यानंतर त्याला आपण शक्तिशाली असल्याचा फील येतो."
हे वाक्य आहेत ख्यातनाम दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे. सत्या, सेक्रेड गेम्स, गैंग्स ऑफ वासेपूर, गुलाल, अग्ली अश्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट देऊन सिनेजगतात त्यांनी आपलं स्वंतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. त्यांच्या बहुतेक चित्रपटात अनकट हिंसा दिसते. मात्र कुठल्याही हिंसेबाबत त्यांची मते एकदम वेगळी आहेत. त्यापेक्षा ती यथोचित अशीच आहेत. विद्वेष आणि भीती हिंसेची मूळ आहेत असे सांगत अनुराग कश्यप यांनी आपले खोलवर विचार अतिशय मोजक्या शब्दात मांडले आहेत.
कामाच्या बाबतीत वेगळे अस्तित्व आणि वेगळी शैली ठेऊन असलेल्या या माणसाची वैचारीक बैठकही तितकीच पक्की आहे. मुलाखतकार संजय आवटे यांनी नेमके विचारलेले प्रश्न आणि अनुराग कश्यप यांनी त्यांच्या शैलीत मोजक्या शब्दात दिलेली अभ्यासपुर्ण उत्तरे यामुळे त्याचा प्रत्यय येतो.
👉 दुप्पट पुरुषांचे ओझे - रंगनाथ पठारे
 |
| Marathi Diwali Ank 2023 lokmat Dipotsav 2023 |
सत्ता आणि पुरुष हे समीकरण किंवा संकल्पना लेखकांनी आपल्या निरीक्षणातून मांडली आहे. त्यासाठी ते आपल्या समोर ढोबळमानाने तीन काळ ठेवतात. पहिला काळ, माणूस जेंव्हा जंगलात किंवा मैदानावर टोळी करून राहत होता. त्यानंतरचा काळ म्हणजे एखाद्या प्रदेशातील सगळ्या प्रकारच्या संपतीवर कब्जा मिळविण्यासाठी प्रसंगी स्थानिकांचा वंशविच्छेद करणे. त्यानंतर एकविसावे शतक. लोकशाही असलेले. येथे स्त्रिया पुरुषांशी स्पर्धा करुन पुरुष होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सत्तेभोवती पुरुषांची संख्या दुप्पट होऊन ते ओझे होत आहे.
स्त्रियांचं स्वातंत्र्य आणि स्वावलंबी होण्याचे हक्क मान्य करीत लेखकांनी अनेक मुद्दे तपशीलवार हाताळलेले आहेत. गौतम बुद्ध ते महात्मा गांधी, वासना आणि तृष्णा, पिझारो ते अलेक्झांडर, स्त्री पुरुष समानता, लोकशाही आणि भांडवलशाही, टायटनिक आणि Conspiracy Theory इत्यादी बाबींचा उहापोह रंगनाथ पठारे यांच्या या लेखात वाचायला मिळतो.
दीपोत्सव (लोकमत) - 2023
लोकमत 'दीपोत्सव' 2023
'पुरुष'
'अस्वस्थ' रहस्याचा शोध....
- ऑलवेज गुड टू बी इन प्रेझेंट! - कुमार मंगलम बिर्ला
- पुरुषपण भार रे देवा.... - सतीश तांबे
- नखे का वाढतात? - डॉं. प्रदीप पाटकर
- शहरातल्या पुरुषाची गोची - मंदार अनंत भारदे
- धुळामातीतला पुरुष - बालाजी सुतार
- एकटे पुरुष - रवींद्र राऊळ
- साली...जबान चालती है? -समीर मराठे
- हस्बैंड का काम क्याह होता हई? कमाना! -हिनाकौसर खान
- बकासुर - श्रीनिवास नागे
- इश्काचा विडा - वंदना अत्रे
- बाईची 'नजर' - शर्मिला फडके
- थ्यांक यू, पेद्रम! - रेणुका खोत
- समानता मानता-मानता..... - योगेश गायकवाड
- 'He' की She'? -शर्मिष्ठा भोसले
- पुरुष गळून पडताना.... - योजना यादव
- पत्नीपीडित - गौरी पटवर्धन
- AI माणसाला खाईल? -विश्राम ढोले
- आज जेवायला काय आहे? - भक्ती चपळगावकर
2 comments:
या review मुळे हा दिवाळी अंक नक्कीच वाचावा लागेल
Thanks
Post a Comment